
स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉप
कालावधी – दोन दिवस
फिज - ६५००/-
कथा, लघुकथा, कादंबऱ्या हे लिखाणाचे किंवा गोष्ट सांगण्याचे सृजानात्मक प्रकार आहेत. लहानपणापासून आपण लायब्ररीतून किंवा विकत आणून पुस्तक वाचत आलोय. त्यामुळे अशा प्रकारच्या पुस्तकाचं लिखाण करणं आपल्याला जमू शकतं.पण, नाटक, टी.व्ही. सिरियल्स, सिनेमा, डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिल्म्स, अॅडस् ह्या परफोर्मिंग आर्ट फॉर्म्ससाठी स्क्रिप्ट लिहिणं हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. कारण लिखाणाबरोबरच ‘लिखाणाचा तांत्रिक साचा’ आणि लिखाणातून दृष्यात्मक गोष्ट मांडण्याची पद्धत ह्यामध्ये माध्यमाच्या गरजेप्रमाणे बदल होतात.म्हणूनच, लिहिणाऱ्यांसाठीचा पुढचा टप्पा म्हणजेच
‘स्क्रिप्ट रायटिंग’
आज सृजनात्मक आणि माध्यमाची गरज ओळखून लिहिणाऱ्या स्क्रिप्ट रायटर्सची नाट्य-चित्रपटसृष्टीला खूप गरज आहे.
शेवटी स्क्रिप्ट हाच कोणत्याही टी. व्ही. सिरीयल/नाटक/चित्रपटाचा आत्मा असतो.
तेव्हा शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे, गृहिणी, अगदी रिटायर्ड मंडळींसाठीही 'स्क्रिप्ट रायटिंग कोर्स’
(वयाची, शिक्षणाची, अनुभवाची अट नाही... हवं फक्त रायटिंगचं पॅशन)
-
टीव्ही/चित्रपटासाठी कथा/पटकथा/संवाद आणि नाट्यलेखनाचा टेक्निकल ड्राफ्ट कसा लिहावा?
-
नाटक/टीव्ही सिरीयल/फिल्म ह्या तिनही माध्यमातील लिखाणामधील फरक
-
प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या लेखनामागची वैशिष्ट्ये
-
दशकामागून दशके बदललेल्या फिल्म/टीव्ही सिरीयल/नाटकाची लेखन शैलीचा मागोवा
-
आजचा लेखक आणि त्याच्यासमोरील आव्हाने
-
लेखक आणि मानधनाचे आकडे
-
स्क्रिप्ट रजिस्टर कुठे करावी?
मार्गदर्शक

अभिराम भडकमकर (लेखक)
* नाटक : ज्याचा त्याचा प्रश्न , देहभान , सुखांशी भांडतो आम्ही
* चित्रपट : बालगंधर्व , आम्ही असू लाडके
* सिरीयल : सैलाब , टीचर
* पुस्तक लेखन : अॅट एनी कॉस्ट

किरण यज्ञोपवीत (लेखक आणि दिग्दर्शक)
* लेखक , दिग्दर्शक : सलाम ,ताऱ्यांचे बेट
* लेखक : नटसम्राट

अंबर हडप (लेखक)
* चित्रपट : बालक पालक , यलो ,बाळकडू , बंध नायलॉनचे
* मालिका : असंभव , सुवासिनी , का रे दुरावा , खुलता कळी खुलेना

कौस्तुभ सावरकर (लेखक)
* चित्रपट संवाद लेखन :
लोकमान्य एक युगपुरुष (सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार)
उत्तरायण (आचार्य अत्रे पुरस्कार)
एवढंस आभाळ (संस्कृती कला दर्पण पुरस्कार)
सौ. शशी देवधर (झी गौरव नामांकन)

अमोल कपोले (लेखक)
* कथा,पटकथा - आराधना (स्टार प्रवाह )
* पटकथा : जुळून येति रेशीमगाठी (झी मराठी) , प्रिती परी तुजवरी (स्टार प्रवाह)
* संवाद : माधुरी मिडलक्लास , स्वप्नांच्या पलीकडले (स्टार प्रवाह)
* कथाविस्तार : गोठ (स्टार प्रवाह)

विनिता पिंपळखरे (लेखक आणि दिग्दर्शक)
* नाट्यलेखन : ५१ एकांकिका (डिसेंबर २००६ मध्ये या सर्व एकांकिकांचा महोत्सव - लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद)
* नाटक : अर्ध विरामाच्या आधीची काही टिम्बे (झी गौरव मानांकन)
* चित्रपट : मिशन चॅम्पियन (झी गौरव पुरस्कार)
* संवाद लेखन : दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनी मालिका
हिच माझी मैत्रीण (ई टिव्ही)
* पटकथा : लेक लाडकी या घरची
* संवाद लेखन आणि दिग्दर्शन : मराठी चित्रपट - गोंदण , संत नामदेव (हिंदी मालिका)
दिनांक : शनिवार २४ आणि रविवार २५ डिसेंबर २०१६
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६
स्थळ : लकाकी हॉल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,तळ मजला,
साहिल हॉटेल समोर,टिळक रोड,स्वारगेट,पुणे ४११००२